प्रा. डॉ. डी.एन.पाटील |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे(सुटा)चे कार्यवाह प्रा.डॉ. डी. एन. पाटील यांची अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या (AIFUCTO) झोनल सेक्रेटरी पदी बिनविरोध निवड झाली.
व्यंकटेश्वरा युनिव्हर्सिटी तिरुपती या ठिकाणी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाची ३१ वी अधिवेशन संपन्न झाले. या कॉन्फरन्समध्ये 'नवीन शैक्षणिक धोरण व नंतरची परिस्थिती' या विषयावर सखोल असे विचारमंथन झाले. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास ९०० प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी प्राध्यापक महासंघाची दोन वर्षासाठीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर सुटा संघटनेचे कार्यवाह9 व कार्यशील पदाधिकारी प्रा.डॉ. डी. एन. पाटील यांची दोन वर्षाकरिता कार्यकारणी मध्ये झोनल सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली.
डॉ.डी.एन.पाटील हे सध्या कागल तालुक्यातील बिद्रीच्या दूध सागर महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मुळात डॉ. पाटील हे अत्यंत शांत व संयमी प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी व प्राध्यापक हितार्थ काम करणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. सामाजिक भान व जाण ठेवून ते सातत्याने विविध चळवळीमध्ये सहभागी असतात. सुटा या संघटनेसाठी त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे असून त्याने वेगवेगळे आंदोलन व लढ्याच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असतात. तसेच सुटा संघटनेने दिलेली जबाबदारी नेटक्यापणाने सांभाळत आहेत.
डॉ. पाटील यांच्या मराठी निवडीसाठी सुटाचे मुख्य समन्वयक प्रा. एस. जी. पाटील, विश्वस्त प्रा. सुधाकर मानकर, प्रा. टी. व्ही. स्वामी, प्रा. ए. पी. देसाई, सुटाचे अध्यक्ष डॉ. आर. के. चव्हाण, डॉ. अरुण पाटील, प्रा. यु. ए. वाघमारे आदींचे सहकार्य लाभले.
त्यांच्या या निवडीने समस्त प्राध्यापक वर्गामध्ये आनंद निर्माण झाला आहे. जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना ते म्हणाले, सुटाने दाखविलेला विश्वास व एआयफुकटोने दिलेली जबाबदारीची जाणीव ठेवून संघटना व प्राध्यापक याच्याशी प्रामणिक राहून त्यांच्या उत्कर्षासाठी कटिबध्द राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा