मा. सुरेश पुकाळे यांचा सन्मान |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी इचलकरंजीच्या "एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय श्रमशक्ती फिनिक्स अवॉर्ड २०२२ या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा इचलकरंजीत संपन्न झाला. यावेळी जयसिंगपूरचे मा.सुरेश विठ्ठल पुकाळे यांना राज्यस्तरीय श्रमशक्ती समाज भूषण फिनिक्स अवॉर्ड २०२२ हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
मा. सुरेश पुकाळे यांनी नामदेव शिंपी समाज कोल्हापूर जिल्हाध्यक्ष , शिवनेरी ग्रुप संस्थापक अध्यक्ष, कवडसा फौंडेशन उपाध्यक्ष तसेच नामदेव शिंपी समाज उपाध्यक्ष जयसिंगपूर या संघटनेच्या माध्यमातून समाजबांधव व समाजातील वंचित घटकासाठी त्यांनी उत्तम काम केलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थिदशेपासून आजपर्यंतचा प्रवास हा संवेदनशील भिमुख राहिलेला आहे. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कौतुकास्पद कामगिरी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची असलेली तळमळ व केलेलं कार्य पाहून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर मा.सुरेश पुकाळे जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाले ,हा पुरस्कार व सन्मान माझा वैयक्तिक नसून हा सन्मान समाज बांधव व संपूर्ण समाजाचा आहे. ते पुढे म्हणाले, सामाजिक कार्य करीत असताना जात,धर्म,पंथ व लिंग याचा विचार न करता माणूस म्हणून जे काही चांगलं करता येईल ते करीत असतो. तसेच हे कार्य करताना देशाचा नागरिक या नात्याने मी आद्य कर्तव्य समजतो.
सदर पुरस्कारामुळे मा.सुरेश पुकाळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा