छावा ग्रुपच्या तरुणाईने आलास मध्ये श्रमातून उभं केलं बस स्टाफ |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
आलास : आलास गाव हे महाराष्ट्राच्या सीमेवरील शेवटचे गाव. या गावातील लोक हे तालुक्याच्या ठिकाणी तसेच कोल्हापूर, जयसिंगपूर , सांगली , इचलकरंजी या ठिकाणी जाण्यासाठी जास्तीत जास्त बसचा उपयोग करतात. पण या गावात एस. टी. महामंडळाचा अधिकृत थांबा आहे पण उन्हाळ्यात या प्रवाश्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असत व पावसाळ्यात पावसात भिजवे लागत असत या मुळे जेष्ठ , स्त्रियां, लहान मुले व शाळकरी मुले याना याचा खूप त्रास होत असे हे ओळखुनच येथील सामाजिक कार्याच्या भावनेने प्रेरित झालेल्या छावा ग्रुपने 'छावा चौक' आलास येथे स्वखर्चातून बसस्थानक उभारण्यात आले आहे . या सामाजिक उपक्रमात छावा ग्रुपच्या सर्व सदस्य यांनी श्रमदान व आर्थिक मदत करून हे बसस्थानक पूर्ण केले.
या बसस्थानकास ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे .या मध्ये ग्रुप चे अध्यक्ष रोहन मगदूम , उपाध्यक्ष शुभम दानोळे, खजिनदार शुभम उपाध्ये व ग्रूपचे सदस्य उपस्थित होते. या बसस्थानकाचे काम इंजिनिअर श्री देवेंद्र दानोळे यांनी पूर्ण केले.
छावा ग्रुपच्या या रचनात्मक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा