सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना श्रीमती माधुरी शिंदे |
*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*
कोल्हापूरः सरस्वती शिंदे एज्युकेशन सोसायटीच्या डी.डी. शिंदे सरकार कॉलेज, कोल्हापूर येथे सोमवार दि.०३ जानेवारी,२०२२ रोजी इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी शिदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्र.प्राचार्य प्रा.डी. एन. देसाई उपस्थित होते.
त्यानंतर इतिहास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाईच्या जीवनपटावर विद्यार्थी, प्राध्यापकांची भाषणे, कविता सादरीकरण, पोवाडा, गाणी इ. कार्यक्रम झाले.याप्रसंगी कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अमिता कणेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सौ. वैशाली सारंग-इतिहास विभाग प्रमुख यांनी केली, सुत्र संचालन कु. मुदिता बनसोडे व वैष्णवी माळवदे यांनी तर आभार ओम करपे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा