Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

जैनापूरात कुमार विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

 

कुमार विद्या मंदिर शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


*जैनापूर प्रतिनिधी :- प्रा. मेहबूब मुजावर*


जैनापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षणमहर्षी ज्योतिबा फुले महान शिक्षण कार्यामुळे महाराष्ट्र श्री शिक्षणाबाबत क्रांती घडली गावागावात मुलींच्या शाळा उभारल्या त्यातून कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचा महिला घडल्या कुटुंब समाज गाव राज्य देश या सर्वांच्या प्रगती श्री शक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

विविध क्षणचित्रे


          ऐतिहासिक कार्याच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यांना विनम्र अभिवादन कुमार विद्या मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले अशावेळी मुख्याध्यापिका सौ. उषा सुतार मॅडम यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधून कुमार विद्या मंदिर येथे आज मुलांच्या वेशभूषा करून आकर्षक प्रभातफेरी काढण्यात आली . तब्बल १० ते १५ वर्ष नंतर १०० पट संख्या असणारी ही फेरी पाहून डोळ्याचे पारणे फिटले कुमार विद्या मंदिर शाळेला हे गतवैभव प्राप्त करून दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  मुख्याध्यापिका सौ .उषा सुतार यांनी फोटो पूजन करून गावातून रॅली  काढताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच महात्मा ज्योतिराव फुले , वारकरी, आदिवासी समाज , कोळी समाज इत्यादी  पोषाख मधून रॅली काढण्यात आली . त्यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक कांबळे सर , प्राध्यापिका धनवडे मॅडम, पाटील मॅडम तसेच विद्यार्थी पालक वर्ग आणि जैनापूरातील ग्रामस्थ  उपस्थित होते. अशावेळी ग्रामपंचायतचे  सहकार्य मिळाले.अशाप्रकारे हा कार्यक्रम 3 जानेवारी बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा