सोमवार, १७ जानेवारी, २०२२

*व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ऑक्टो. / नोंव्हे.परीक्षा अर्ज भरण्याच्या मुदतीत पुन्हा वाढ : प्र. संचालक मा.गजानन पळसे*

 

मा.गगजानन पळसे,प्र.संचालक, SUK


*हेमंत कांबळे  :कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर  :  शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील ऑक्टो, / नोव्हे २०२१च्या हिवाळी सत्रातील परीक्षेचे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अर्ज स्विकारण्याच्या तारखामध्ये दि. १९ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

     तथापि, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे (शिक्षणशास्त्र , अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, टेक्सटाईल्स, बी-टेक., विधी, एम.बी. ए. YCSRD कडील अभ्यासक्रम व इतर सर्व परीक्षेकरीता) प्रथम वर्षाचे व थेट द्वितीय वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्याने काही विद्यार्थी अद्याप परीक्षा अर्ज भरू शकलेले नाहीत. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्याबाबत व महाविद्यालयाने परीक्षा यादया सादर करण्याबाबत  सुधारित तारखा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

      विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात, पदव्यूत्तर महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागाने  परीक्षा अधिविभागामध्ये परीक्षा अर्ज भरावयाच्या सुधारित तारखा विनाविलंब शुल्क दि. १९.०१.२०२२ अखेर,महाविद्यालय अथवा पदव्यूत्तर महाविद्यालयाने परीक्षा अर्ज online(approve) करण्याच्या सुधारित तारखा विनाविलंब शुल्क दि. १९.०१.२०२२ अखेर आहेत. तसेच महाविद्यालयाने विद्यापीठामध्ये अर्जाच्या यादया सादर करावयाच्या सुधारित तारखा विनाविलंब शुल्क दि. २० जानेवारी २०२२ पर्यंत आहेत.

      सर्व व्यावसायिक अभ्यास क्रमाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्या करीता परीक्षा अर्ज भरण्याच्या सुधारित तारखाबाबतचे सदरचे परिपत्रक सर्व संबंधीत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे अशा प्रकारची माहिती

मा.गजानन पळसे ,प्र. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा