Breaking

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

*कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम संपन्न*

 


दत्त कॉलेजमध्ये कोरोना लसीकरण मोहीम


प्रा. अमोल सुंके : कुरुंदवाड प्रतिनिधी


कुरुंदवाड  :येथील श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वय वर्षे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या  लसीकरणाची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आली.

       कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे .पाटील यांनी केले तर बिरादार डी.एन. यांनी प्रास्ताविक करत असताना रोगापेक्षा काळजी घेतलेली केव्हाही बरी आणि महाविद्यालयांमध्ये प्रत्येक घटकांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आरोग्य अधिकारी सौ तराळ यांनी कोरोणा प्रतिबंधक लसी चे महत्व व कोरोणा लसीसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले यासाठी आरोग्य अधिकारी रेखा तराळ, आरोग्य सेविका अनारकली शेख, सुजाता नरके, ऑपरेटर रिजा कुन्नूरे व निलेश पाटील याचबरोबर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा