कोल्हापूर सीपीआर |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कारोनाची लागन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे . डॉक्टर व विद्यार्थी असे मिळून ३७ जणांना कोरोना पॉझिटीव्ह झाला आहे . त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या सीपीआरमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
तसेच या डॉक्टरांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सुरु झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये बाधितांना सौम्य लक्षणे दिसून आली . या सर्वांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत . सीपीआरमधील रुग्णांची सेवा अखंडीत आणि सुरळीत सुरु आहे. तरी रुग्णांना घाबरण्याचे काहीच कारण नाही असे प्रशासना कडून सांगण्यात येत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा