Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास जयसिंगपुर पोलीस ठाणेस यश व पोलिसांची उत्तम कामगिरी*

 

जयसिंगपुरात दुचाकी चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


जयसिंगपुर :  पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी श्री. दत्तगुरु बंडु बेरडे वय वर्ष ५४ रा.रूणवाल टॉवर जयसिंगपूर ता.शिरोळ यांनी दुचाकी वाहन चोरीस गेलेची माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली होती.

    पोलीस अंमलदार ८८५ संदेश शेटे, १३३३ रोहीत डावाळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार उपविभागिय पोलीस अधिकारी जयसिंगपुर श्री.वैंजणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली पोसई वाघ, पोसई पाटील, परि. म. पोसई टकले, सहा. फौजदार तानाजी गुरव, सहा फौजदार सोमानथ चळचुक, पो.ना.बाबाचाँद पटेल, पो. कॉ. संदेश शेटे, पो.कॉ. रोहीत डावाळे, चालक पसहा. फौजदार संजय देशमुख यांनी संशयीत इसम नामे - १) कुमार तानाजी खैरे व.व. ३७.रा. विठ्ठल मंदीर शेजारी तासगाव जि. सांगली यास शिताफीने पकडले.

      मिळालेल्या अधिकृत सूत्रानुसार मा पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील सराईत मोटर सायकल चोर गुन्हेगार व संशयीत इसम चेक करुन त्यांचेकडे तपास करुन मोटर सायकल गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे जयसिंगपुर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडील सहा. फौजदार तानाजी गुरव,, पो.कॉ. संदेश शेटे, पो.कॉ.रोहीत डावाळे असे जयसिंगपुर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेल्वेस्टेशन तिकीट ऑफीस समोरील पार्किंगमधुन  एक इसम संशयित रित्या वावरत असलेबाबत माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन पाहता एक इसम लाल निळ्या रंगाच्या ३ मोटर सायकलीजवळ थांबलेला मिळुन आला. तसा त्याचा संशय आलेने त्यास ताब्यात घेवुन सदर मोटर सायकलाबत चौकशी केली असता त्याने काही समाधानकारक माहीती न सांगता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरच्या मोटर सायकलीपैकी एक डिस्कवर मोटर सायकल रुनवाल टॉवरचे पार्किग, गल्ली नं ९ जयसिंगपुर येथुन व दुसरी मोटर सायकल दिड वर्षापुर्वी पायोस हॉस्पिटल जयसिंगपुर येथुन तसेच एक मोटर सायकल गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केले असलेचे सांगितल. त्याबाबत आम्ही जयसिंगपुर पोलीस ठाणे अभिलेखावर पाहणी केली असता सदर गाडयांबाबत जयसिंगपुर पोलीस ठाणे गुर नं ५/२०२२ व १८९/२०२० व गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे गु र नं २७३/२०२१ भादविस कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहेत.

     तरी संशयीत इसम  कुमार तानाजी खैरे व.व. ३७ रा. विठ्ठल मंदीर शेजारी तासगाव जि. सांगली यांचेकडुन १) २५०००/- रुपये किमतीची बजाज कंपनीची डिस्कवर मोटर सायकल, २) २५०००/- रुपये | किंमतीची हिरो होंडा कंपणीची प्लेंडर ३) १५०००/- रुपये हिरो होंडा कंपणीची स्प्लेंडर मोटर सायकल असा एकूण ६५०००/- रुपये किमतीच्या तीन मोटर सायकली संशयीत इसमासह सविस्तर पंचनाम्यासह ताब्यात घेतली आहे.

     सदर यशस्वी मोहीम पोलीस प्रशासनाच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सतर्कतेमुळे झाले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 टिप्पणी: