पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेड |
*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : लोकराजे राजश्री शाहू महाराज यांनी जयसिंगपूर शहराची रचना आखीव रेखीव पद्धतीने केली आहे.मात्र वाढती लोकसंख्या व वाहन संख्या यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.शहरातील मुख्य चौक असणाऱ्या कांती चौकातील सिग्नल लाखों रुपये खर्च करून बसविण्यातआला आहे. परंतु सदर सिग्नल बसवून जवळपास १० वर्ष झाले तरी सिग्नल चालू केलेला नाही.शाळा व काॅलेज चालू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रोड पास करताना त्रास होत आहे व काही वेळा दुर्घटना देखील होत आहेत. त्याचबरोबर मुख्य चौकात असणारा कट्टा नादुरुस्त झाला असल्याने त्याच्या विटा रस्त्यावर येवून अपघात होत आहेत तरी तो कट्टा लवकरात लवकर रिपेअर करावा.
जयसिंगपूर नगरपरिषद व जयसिंगपूर पोलिस ठाणे यांनी चर्चा करून लवकरात लवकर सिग्नल चालू करावे अन्यथा जयसिंगपूर नगरपालिका समोर आम्हाला आंदोलन करावे लागेल.यावेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास याची सगळी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे निवेदन जयसिंगपूर मुख्याधिकारी व जयसिंगपूर पोलिस ठाणे यांना निवेदन दिले .
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड शिरोळ तालुका अध्यक्ष अक्षय पाटील, मा.नगरसेवक चंद्रकांत जाधव, अमोल धुमाळे, इकबाल सुदरणे,रोहन कोटलगी, कुकडे सर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा