मिशन नोकरी |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
शिरोळ : नृसिहंवाडी, औरवाड, गौरवाड, आलास,बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ व गणेशवाडी या सर्व गावांसाठी कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे मोफत 'मिशन नोकरी' अभियान रविवार दि 16/01/2022 रोजी सकाळी 9 वाजता लालबहादूर हायस्कूल कवठेगुलंद येथे कोविड चे नियम पाळून संपन्न होणार आहे.ग्रामीणभागातील सुशिक्षित पण बेरोजगार किंवा नोकरीतला अनुभवी असणाऱ्या तमाम तरुण तरूणीसाठी हे अभियान कार्यरत राहणार आहे.
या कृष्णा-पंचगंगा सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रसाद दुग्गे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आवाहन केले की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आमच्या संस्थेमार्फत मिशन नोकरीचे आयोजन करण्यात येत आहे तरी सर्व सुशिक्षित बेरोजगार यांनी याचा लाभ घ्यावा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा