संभाजीपुरात महिलेची आत्महत्या |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
संभाजीपुर मध्ये एका महिलेने आत्महत्या केली आहे. सदर मयत महिला छाया जगन्नाथ गवळे वय वर्ष ५८ असून हिने राहत्या घरात लोखंडी ग्रीलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.रात्री ११.०० ते रविवारी सकाळी ७.०० वाजण्याच्या अगोदर ही घटना घडली आहे. याबाबत जीवन गवळे यांनी जयसिंगपूर पोलिसात माहिती दिली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, छाया गवळेने राहत्या घरातील पोर्चमध्ये असलेल्या लोखंडी गेटच्या मध्ये लोखंडी पाइप टाकून या पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ती घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांनी दिली. पुढील तपास पोलिस नाईक सूर्यवंशी करीत आहेत.
या घटनेने संभाजीपुर परिसरात दुःखदायक वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा