Breaking

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलीत साधन केंद्र, हातकणंगले वतीने जयसिंगपूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वितरित केल्या ४०० कापडी पिशव्या*

 

कापडी पिशव्यांचे वाटप करताना अधिकारी


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलीत साधन केंद्र, हातकणंगले या संस्थेअंतर्गत जयसिंगपुर नगरपरिषदे मध्ये बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशवी वाटप करण्यात आले.

          राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत गट स्थापना व प्रशिक्षण यांचे काम  सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर कार्यक्षेत्रात  स्वच्छता व प्लास्टिक निर्मुलन जनजागृती करण्याच्या उद्देशाने सफाई कामगार, पाणी सोडणारे  व नगरपालिकेचे कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते ४०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले . 

     या प्रसंगी डेप्युटी CO, डॉ.पवन मेहत्रे , APO देशमुख मँडम , समुह संघटक खामकर मँडम , cmrc व्यवस्थापक दिपाली बागडी व   सहयोगीनी उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक दिपाली बागडी यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती पाटूकले यांनी केले.

      सदर कार्यक्रमाचे संबंधित घटकाकडून कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा