कोल्हापूर : न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे दिनांक ७ ते १० जानेवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या लसीकरण मोहिमेला विद्यार्थ्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयातील ११ वी व १२ वी कला वाणिज्य व शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालये प्राचार्य.डॉ.व्ही. एम.पाटील ,ज्युनियर चे प्राचार्य. मा.प्रा. टी.के सरगर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. आर्. एस. किरुळकर ,प्रा.सौ. एन. पी.कासार,प्रा. एन. एस.शिंदे ,तसेच कोल्हापूर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.सी.कुंभार,पर्यवेक्षक विजय माळी,क्रीडा निरीक्षक .सचिन पांडव.वैद्यकीय अधिकारी . डॉ.योगिता भिसे, व परिचारिका उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा