आयोजीत ऑनलाइन व्याख्यानात बोलताना डॉ.अतिश पाटील |
प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
रुकडी ( बातमीदार / प्रतिनिधी ) मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची होणारी हानी अशीच सुरु राहीली तर २०५० पर्यंत पृथ्वीवरील मानवाचे जगणे मुश्कील होईल, त्यामुळे मानवाने आत्ताच सावध होऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नैसर्गिक घटकांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणात विपरीत बदल होऊन अवकाळी सारख्या घटना वारंवार घडत आहेत असे मत डॉ. अतीश पाटील यांनी व्यक्त्त केले.
ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरॕक्ट क्लब ऑफ राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रूकडी, रोटरॕक्ट क्लब ऑफ अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले, रोटरॕक्ट क्लब ऑफ श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी यांच्या संयुक्त्त विद्यमाने भूगोल दिनानिमित्त आॕनलाईन आयोजित केलेल्या "मानवी हस्तक्षेपामुळे होणारे पर्यावरणीय बदल " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अशोक पाटील यांनी केले. यावेळी रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष रो. यतिराज भंडारी, रोटरॕक्ट क्लब इचलकरंजीचे डायरेक्टर रो. नागेश दिवटे यांनीही मनोगत व्यक्त्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले मानवाच्या पर्यावरणातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील सर्वच सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, मानवाने आता डोळे उघडून पर्यावरणाची होणारी हानी टाळली पाहिजे तरच मानवासह सर्व सजीवांचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून राहील. ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानासाठी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभार बी.ए. भाग एक विद्यार्थी मधील श्री.रोहित राजमाने यांनी मानले तर सूत्रसंचालन बी. ए. भाग-२ मधील विद्यार्थीनी कु.सोनम कांबळे हिने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा