रुकडीमध्ये माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण |
*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*
रूकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात कै. संभाजीराव माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या अठ्ठाविसाव्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेत वसंतदादा पाटील महाविद्यालय सांगलीची कु. आलिषा अनिल मोहिते हिने प्रथम क्रमांक मिळविला द्वितीय क्रमांक श्री. मिथुन दत्तात्रय माने एल.बी.एस.कॉलेज सातारा तर तृतीय क्रमांक कु. प्रियदर्शनी जयगोंडा पाटील एन.एस.लॉ कॉलेज सांगली आणि उत्तेजनार्थ कु. प्रज्ञा दाजी पाटील देशभक्त्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय चिखली यांनी मिळविला विजेत्या स्पर्धकास प्रमाणपत्र, गौरवचिन्ह व रोख रक्कमेची बक्षिसे देऊन सन्मानीत करण्यात आले. या वक्त्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ,वार्षिक क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धा प्रकारात प्रावीण्य संपादन केलेले विद्यार्थी तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विविध विषयात व वर्गात प्रथम आलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ असा संयुक्त्त पारितोषिक वितरण समारंभ बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. वारणा शिक्षण संस्था वारणानगरच्या प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे यांनी केले. कार्यक्रमास रो.यतिराज भंडारी रो. गुलाबचंद तोष्णीवाल रो. नितीनकुमार कस्तुरे रो.श्रीकांत राठी रो.बाळासाहेब देवनाळ तसेच प्राचार्या सौ. उज्ज्वला अमर बुल्ले, प्राचार्या डॉ.आरती भोसले, मुख्याध्यापिका सौ.पद्मजा पाटील, मुख्याध्यापिका सौ. आशा सूर्यवंशी संस्थेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाची भूगोल विषयात पीएच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.अशोक पाटील, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचा आउट स्टँडींग टीचर अवार्ड मिळाल्याबद्दल डॉ.उत्तम पाटील आणि रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचा आउट स्टँडींग टीचर अवार्ड मिळाल्याबद्दल डॉ. खंडेराव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोटरी क्लब व महाविद्यालयाच्या वतीने बी.ए.भाग तीन मधील विद्यार्थीनी कु.मिस्बा भालदार यांना शिलाई मशिन भेट दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. गिरीश मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.माधवी सोळांकुरकर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा