Breaking

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

संतापजनक !जांभळी जिल्हा परिषद शाळा नं.1 बनली तळीरामांचा अड्डा*

 

शाळेसमोरच दारूच्या बाटल्यांचा खच


 *जांभळी प्रतिनिधी : शशिकांत घाटगे*


शिरोळ तालुक्यातील जांभळी जिल्हा परिषद विद्या मंदिर शाळा नंबर 1 माळभाग ही शाळा तळीरामांचा अड्डा बनत चालला आहे. शाळेचे गेट नादुरुस्त असल्यामुळे शाळेत तळीरामांना बसण्याची सोय होत आहे चुकीच्या घटना घडत आहेत विद्येची देवता असलेली शाळेमध्ये गैरकृत्य होत आहे. शाळेला गेट नसल्यामुळे जनावर सोडणे, शाळेच्या वेळेत ग्राउंड वर खेळण्यास येणे व शाळेच्या कंपाउंड भोवती कचरा टाकणे असे प्रकार घडत आहेत. शिक्षक विद्यार्थी यांना या गोष्टींचा नाहक त्रास होत आहे ग्रामपंचायतीने शाळेला गेट बसवणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,भौतिक सुख सुविधा देणे व आपली शाळा म्हणून सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे व अशा तळीरामांना धडा शिकविण्याचे आवश्यकता नाही.

   शिक्षणप्रेमी,पालक,शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षक यांनी नाराजी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा