सांगलीतील नेरले कापूस खेड परिसरात बिबट्याचा दर्शन |
*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*
सांगली : काल रात्री नेर्ले- कापुसखेड रस्त्यावरून मोटरसायकलने जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याने हल्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटारसायकल चालकाने प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका केली. त्यानंतर सदर गावातील युवकांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याचा मागमूस लागला नाही.
गुरुवारी रात्री कापुसखेड येथील महाविद्यालयीन तरुण अनिकेत पाटील आपल्या बहिणीसह मोटारसायकल वरून नेर्ले येथे पाहुण्यांकडे गेले होते.मात्र रात्रीच्या वेळेस मोटारसायकलवरून जिल्ह्यातील कापुसखेडकडे जात असतताना नेर्ले येथील कदम वस्तीनजीक ऊसातून आलेल्या बिबट्याने मोटारसायकल वरती झेप घेतली.अनिकेतने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मोटारसायकलचा वेग वाढवला. मात्र तरीही बिबट्याने १०० ते १५० मीटर मोटारसायकलचा पाठलाग केल्याची माहिती समोर येत आहे.
सांगली जिल्ह्यातिल कासेगाव येथील तिघेजण दोन मोटारसायकल वरून कापुसखेड कडून नेर्लेकडे जात होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलचाही पाठलाग केला. यावेळी तिघांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने नजिकच्या ऊस परिसरात निघून गेला. या प्रकाराने घाबरलेल्या तिघा प्रवासानी नेर्ले गावात आल्यावर ही माहिती ग्रामस्थांना दिली.दरम्यान कापुसखेड येथील युवकांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी येऊन युवकांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कापूसखेड ग्रामपंचायतिच्या वतीने गावात दवंडी देण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी कापुसखेड-नेर्ले दरम्यान मोटारसायकल वरून प्रवास करू नये, प्रवासा दरम्यान सतर्कता बाळगण्याच्या सूचना ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याचे सरपंच मंदाताई धुमाळे यांनी सांगितले.
गेल्या दीड-दोन महिन्यापासून बिबट्याने नेर्ले-कापुसखेड शिवेवर धुमाकूळ घातला आहे. मरीग, डेसकत, ओढा परिसरातील वस्त्यांवरील कुत्री त्याने फस्त केली आहेत. रात्रीच्या वेळी कापुसखेड-नेर्ले रस्त्यावर बिबट्या वारंवार दिसत आहे. त्यामुळे गावकरी ,शेतकरी व विशेष करून प्रवाशांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने वेळीच याकडे गांभीर्याने लक्ष देत बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकाकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा