Breaking

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

शेवटच्या क्षणापर्यंत समाज परिवर्तन व महिलांच्या हितार्थ झटणारी एक सक्षम स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले : प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर

 

प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर मार्गदर्शन करताना


*गीता माने : सहसंपादक*


कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयात इतिहास विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर इतिहास विभाग व इतिहास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. आबासाहेब चौगले यांनी भूषविले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख प्रा. डॉ. संतोष जेठिथोर यांनी केले. यानंतर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सर्जेराव पद्माकर यांनी 'सावित्रीबाई फुले: जीवन व कार्य' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा घेतला. सामाजिक कार्य करत असताना फुले दांपत्याना आलेल्या अडचणी कोणत्या स्वरूपाच्या होत्या. याविषयी विवेचन केले. महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवून शिक्षिका बनविले. यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या हितासाठी झगडले. मुलींची पहिली शाळा काढून स्त्रियांना मानसन्मान मिळवून दिला. हा सावित्रीबाई फुले यांचा विचार आजच्या सावित्रीच्या लेकींनी पुढे नेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. 

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. आबासाहेब चौगुले म्हणाले, सावित्रीबाईंचे पूर्ण जीवन पट हा आजच्या स्त्रियांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे तसेच पुरुष प्रधान संस्कृतीचे ढोल वाजविणाऱ्याना प्रवृत्तीला स्त्री समानता स्वीकारण्यास भाग पडते. खरंच आज या देशाला सावित्रीच्या लेकीची आवश्यकता आहे.

   या सुंदर अशा कार्यक्रमाचे आभार प्रा. सौ.लतिका सावेकर यांनी मानले.  यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक  डॉ. आदिनाथ गाडे, डॉ. धनाजी पाटील, प्रा. आप्पासाहेब फारणे, प्रा. कल्पना गुरव एन. सी.सी. कॅडेट व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

     आजच्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा