ज्येष्ठ विचारवंत प्रसाद कुलकर्णी मार्गदर्शन करताना |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
सडोली दुमाला : आपल्या भवतालच्या सर्वांगीण परिस्थितीत अतिशय वेगवान बदल होत आहेत.या बदलांची इष्ट - अनिष्टता विद्यार्थ्यांनी चौकस होत समजून घेतली पाहिजे.तसेच शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांचा डोळसपणा अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.याचा विसर पडू देता कामा नये.उद्याचा समृद्ध भारत आजचे विद्यार्थीच घडविणार आहेत.त्यामुळे परीश्रम पूर्वक यश खेचून आणण्याची तयारी सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनीनी ठेवली पाहिजे.वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ हा शालेय जीवनात नवी ऊर्जा देणारा दिवस असतो असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते आंतरभारती शिक्षण मंडळ इचलकरंजीच्या माध्यमिक विद्यालय सावर्डे सडोली दुमाला (ता करवीर जि. कोल्हापूर )या प्रशालेच्या बत्तीसाव्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शामराव नकाते होते.यावेळी माजी आमदार संपतराव -पवार पाटील(बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसाद कुलकर्णी यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलन ते नवे शैक्षणिक धोरण आणि महात्मा फुले ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम आदींची उदाहरणे देत मार्गदर्शन केले.यावेळी माजी आमदार संपतराव पवार - पाटील यांनी शिक्षणातून दिला जाणारा संदेश आणि त्याउलट दिसणारे वास्तव यावर मत मांडले.शामराव नकाते यांनी अध्यक्षस्थाना वरून विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान देणारे विचार मांडले.यावेळी मंचावर आंतर भारतीचे सचिव गणपतराव फाटक , सरपंच छाया मनोहर कांबळे, सरपंच सुवर्णा कुंडलीक कारंडे ,उपसरपंच वंदना बळीराम पाटील उपसरपंच शालाबाई पांडुरंग निकम,विनायक होगाडे,विनायक चव्हाण, माजी मुख्याध्यापिका भागवत , प्रिया होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते रांगोळी,हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.तसेच विविध खेळात, स्पर्धात यशस्वी झालेल्यांना पारितोषिके देण्यात आली.शुभम सदाशिव केसरकर व शामबाला दिनकर नलवडे यांचा प्रशालेचे आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला.
स्वागत व पाहुण्यांचा परिचय तोरस्कर सर यांनी करून दिला.माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. एस.पाटील यांनी प्रास्ताविक अहवाल वाचन केले.जिमखाना प्रमुख सौ.एम.एन.भोसले ,सांस्कृतिक विभाग प्रमुख पी.पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते 'शब्दप्रपंच ' या हस्तलिखित अंकाचे प्रकाशन करण्यात आले.विद्यार्थी विद्यार्थिनीनी प्रार्थना,समूहगीत व स्वागतगीत सादर केले.कदम सर यांनी आभार मानले.विद्यार्थीनी प्रतिनिधी आश्लेषा निकम शाळेचा जनरल सेक्रेटरी आदर्श मोहिते यांच्यासह सर्व स्टाफ ,विद्यार्थी - विदयार्थीनी,ग्रामस्थ बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा