रिलायन्स मिडिया |
करण व्हावळ : विशेष प्रतिनिधी
दिल्ली : 'अमेझॉन', 'नेटफ्लिक्स', 'हॉटस्टार'सारख्या 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मसाठी धोक्याची घंटी वाजली आहे. कारण, आता भारतातील सर्वात मोठा स्वदेशी उद्योग समूह.. अर्थात 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड' या क्षेत्रात उतरणार आहे.. 'मीडिया बिझनेस'ला मजबूत करण्याचा मोठा निर्णय 'रिलायन्स'ने घेतला आहे..
'रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल मीडिया'ला मीडिया बिझनेस वाढवायचा आहे. त्यासाठी 'रिलायन्स'ने गुंतवणूकदारांनाही सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांकडून 12000 कोटी रुपये 'रिलायन्स' जमा करणार आहे.
*भारतातील सर्वात मोठे स्वदेशी मनोरंजन नेटवर्क*
वायकॉम-18, नेटवर्क-18 आणि 'वायकॉम सीबीएस' यांचे एकत्रित 'व्हेंचर' आहे. त्यात नेटवर्क-18 चा वाटा 51 टक्के, तर वायकॉम सीबीएसचा 49 टक्के आहे. 'वायकॉम-18' हे 52 चॅनेलची ऑफर देऊन महिन्याला जवळपास 6 कोटी भारतीयांपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे देशातील हे सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क होणार आहे.
मीडिया बिझनेस'ची रणनीती ठरवण्यासाठी 'रिलायन्स'ने 'स्टार' व 'डिज्ने इंडिया'चे माजी अध्यक्ष उदय शंकर, तसेच माध्यमतज्ज्ञ जेम्स मर्डोक यांनाही त्यात सहभागी करून घेतले आहे. 'मीडिया बिझनेस'च्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची असनार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा