Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

ख्रिस्ती समुदायावर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करा..ख्रिश्चन एकता मंचची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन.


जीवन आवळे  : विशेष प्रतिनिधी


रत्नागिरी:- गेल्या काही अनेक महिन्यांपासून देशातील विविध ठिकाणी ख्रिस्ती समुदायावर हल्ले होत असून असे कृत्य करणाऱ्या समाजकंटक विरोधात कठोर अशी कारवाई करावी अशी मागणी ख्रिश्चन एकता मंचच्या वतीने ख्रिस्ती संविधानिक हक्क आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

       मागील वर्षापासून देशातील विविध राज्यांमध्ये ख्रिश्चन समाजावरती अन्याय होत आहे. विशेष करून कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये नाताळ सणाच्या दिवशी ख्रिस्ती बांधवांवर हल्ले  केले गेले आणि ख्रिश्चन धर्मगुरूंना मारहाण करण्यात आली. पवित्र धर्मग्रंथ व इतर धार्मिक साहित्यांची विटंबना करण्यात आली.

     जे लोक प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये आले होते, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. ख्रिश्चन समाजाच्या संविधान धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे, चर्चच्या भक्ती आराधनेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईचे करण्याचे निर्देश राज्य सरकारने द्यावेत, धर्मगुरू धर्मांतर करण्याचे दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, चर्चवर हल्ले करणाऱ्या जातीवादी संघटनांवर बंदी घालावी व चर्चना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

        ख्रिस्ती समुद्रावर होत असलेले हल्ल्याचा निषेध नोंदवून समाजकंटकांचे हल्ले रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी मागणीचे निवेदन ख्रिश्चन एकता मंचच्या वतीने ख्रिस्ती संविधानिक हक्क आंदोलनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

       यावेळी ख्रिश्चन एकता मंचाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजय तिवडे, कार्याध्यक्ष अमित भोरे, राज्य उपाध्यक्ष मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जॉन विजय भोरे, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष निवास वाघमारे व रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्ष अंकिता वाघमारे उपस्थित होते.

1 टिप्पणी:

  1. As Per the Guidance of our National President Brother Prabhudas Dupte Christian Ekta Manch Team Has done the Best in All parts of our Country, By Approaching The Different States Collectors With an Urge letter to be given to our PM Narendra Modi, Showing the concern of our Christian Community & Fighting for our Constitutional Rights Under Article 19-1A *& Article 19-1B. We have been doing this Task Peacefully following the COVID Pandemic Precautions.

    उत्तर द्याहटवा