ऊसतोड मजुराच्या पुतणीचा चाकाखाली मृत्यू |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड-मजरेवाडी दरम्यान शेतातील रस्त्यावरून ऊस वाहतूक करत असताना बैलगाडीच्या चाकाखाली सापडून ऊसतोड मजुरांची ११ वर्षाची पुतणी जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पायल संतोष लाडाने असं त्या अपघाती मयत झालेल्या मुलीचं नाव असून ऊस तोड मजूर बीड जिल्ह्यातील आहेत. घटनास्थळी तिच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर आश्रोबा बापू लाडाने हे गुरुदत्त साखर कारखान्यासाठी ऊसतोड करतात. लाडाने यांच्या एक वर्ष बाळाचा सांभाळ करण्यासाठी त्यांची पुतणी पायल ऊस तोडीचे ठिकाणी आली होती. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आश्रोबा लाडाने आणि त्यांच्या दहा सहकार्यांसोबत तेरवाड हद्दीतील नितीन दत्तवाडे यांच्या शेतातील ऊस तोडून बैलगाडीत भरला. त्यानंतर बैलगाडी शेतातील रस्त्यावरून बाहेर काढत असताना मयत पायल बैलगाडीवर चढली होती. त्याच वेळी ती बैलगाडी वरून बैलगाडीच्या डाव्या चाकाखाली पडली. अंगावरून उसाने भरलेल्या बैलगाडीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चुलता आश्रोबा, लक्ष्मीबाई यांच्यासह ऊसतोड मजुरांनी एकच आक्रोश केला.
गुरुदत्त साखर कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी अभिजीत जाधव यांच्यासह विभागातील कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी येऊन पाहणी केली. सदर घटनेची कुरुंदवाड पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली आहे.
या घटनेने सदर परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा