Breaking

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

*संतापजनक ! कोल्हापूरातील वारे वसाहत मध्ये दोन गटात तुफान हाणामारी : एकाची प्रकृती गंभीर*

 

कोल्हापुरात दोन गटात प्रचंड हाणामारी


*हेमंत कांबळे  : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


कोल्हापूर :  शहरानजीक वारे वसाहत येथे आज (शनिवार) सायंकाळी दोन गटात तुफान राडा झाला. या हाणामारीत पृथ्वी आवळे वय वर्ष २४ रा.वारे वसाहत कोल्हापूर हा तरुण  गंभीर जखमी झाला .त्याच्या छाती, डोके व पाठीत गंभीर इजा झाल्याने त्याला तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 

    या तुंबळ हाणामारीत एका महिलेसह  ४ जण जखमी झाले असून, त्यांना शासकीच रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या हाणामारीत तलवार, चाकू, कोयता यासाखी  घातक हत्यारांचा वापर करण्यात  आल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. जखमी  दादासाहेब माने, सुजल कांबळे आणि रुपाली आवळे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.दोन्ही गटाकडील जखमींच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

      या घटनेने सदर परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा