आरबीआय मध्ये सहाय्यक पदाची भरती |
दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेत नोकरीची (Jobs) प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. RBI ने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये ९५० सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.सदर जाहिरातीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेने दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
कट ऑफ तारखेनुसार उमेदवाराचे वय २० ते २८ दरम्यान असावे. पण, राखीव प्रवर्गातील उमेदरवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करावा. RBI द्वारे १७ फेब्रुवारी २०२२ पासून सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याविषयी माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे. तर ८ मार्च २०२२ पर्यंत अर्ज ऑनलाइन सादर करता येतील.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल वेबसाईटमध्ये माहिती दिली आहे. उमेदवारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) असे टप्पे पार पाडावे लागतील. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २६-२७ मार्च २०२२ रोजी होणार आहे.
तरी संबंधित उमेदवाराने या जाहिरातीचा फायदा करून घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा