तरुण ऊसतोड मुजराची आत्महत्या |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : उमळवाड ता. शिरोळ येथे २८ वर्षीय तरुण ऊसतोड मजुरांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाळू चंद्रभान फुलमाळी रा. कोकणा ता. नेवासा जि.अहमदनगर असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.ही घटना मंगळवारी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ०८.०० वाजण्याच्या सुमारास बबन मोटे यांच्या शेतालगत घडली आहे.याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल स्मिता कांबळे यांच्यासह महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अंजना बन्ने व सचिन चौगुले यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. सदर मयत बाळू फुलमाळी याने बबन मोटे यांच्या शेतात असलेल्या झाडाला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. देवगोंडा अण्णासो पाटील रा. उमळवाड यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये वर्दी दिली आहे. मयत बाळू फुलमाळी यांनी आत्महत्या का केली याचा जयसिंगपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दोन महिन्यापूर्वी ऊसतोड मजूर म्हणून बाळू फुलमाळी आला होता. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच ऊसतोड मजुरांच्या टोळीत शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा