Breaking

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. परशुराम माने इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण*


 प्रा. परशुराम माने सेट परीक्षा उत्तीर्ण


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात (UGC)संलग्नित सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे आयोजित 'सहाय्यक शिक्षक पात्रता परीक्षाइतिहास विषयातून उत्तीर्ण झाले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून आपली शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केली असून पदवी व पदव्युत्तर शिक्षण जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर व कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली येथे झाले.तर बी.एड. पुतळाबेन शहा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगली येथे त्यांनी पूर्ण केले. सध्या ते जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशात स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे व सर्व संस्था पदाधिकारी प्राचार्य डॉ.सौ. मनिषा काळे, माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ.डी.व्ही.चांदणे, उपप्राचार्य डॉ.एस.बी.बनसोडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.

    त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा