Breaking

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

*विद्यापीठाच्या क्लस्टर योजनेच्या दि.०७/०२/२०२२ रोजीच्या सर्व परीक्षा तसेच विद्यापीठाची उद्याची मॉक टेस्ट रद्द ; मंगळवारी या वेळेस होणार मॉक टेस्ट?*

 

गजानन पळसे प्र. संचालक, परीक्षा विभाग


   *प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर :  भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज दि.०६/०२/२०२२ रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोमवार दि ०७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात दुखवटा म्हणून महाराष्ट्र शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्रं. सार्वसु-११२२/प्र.कं / २१ कार्या २९, च्या संदर्भपत्रा नुसार महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. तसेच त्यानुसार शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली असल्याने ऑक्टो/नोव्हें २०२१ मधील हिवाळी सत्रातील विद्यापीठ/क्लस्टर/महाविद्यालयांतर्गत सुरू असलेल्या सोमवार दि ०७/०२/२०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करून यथावकाश पुढे आयोजित करण्यात येतील.

      तसेच फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२.३० वा. विद्यापीठामार्फत आयोजित केलेली मॉकटेस्ट ही मंगळवार दि. ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी ०३.३० वाजता होईल.सदरचे माहिती परिपत्रकाद्वारे श्री. गजानन पळसे(प्र संचालक मूल्यमापन मंडळ) यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा