Breaking

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

*श्रीक्षेत्र आदमापुर येथे बाळूमामाच्या वस्तू संग्रहालयाची उभारणी ; या माध्यमातून बाळूमामाचा जीवनपट उलगडणारा*

 

श्री संत बाळूमामा, तीर्थ क्षेत्र आदमापूर 


*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


       कोल्हापूर : जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्र प्रदेश या  राज्यांतील लाखो भाविक बाळुमामा च्या दर्शनासाठी येत असतात. भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या  बाळूमामा मंदिर परिसरात वस्तुसंग्रहालय (mesuam) आकार घेत आहे.

      या वस्तुसंग्रहालयात बाळूमामांचा जीवनपट, वापरातील दुर्मीळ वस्तू, पोशाख पाहण्याची संधी भक्‍तांना उपलब्ध होणार आहे. जवळपास ५८ लाख रुपये खर्चून हे वस्तुसंग्रहालय या ठिकाणी उभे करण्यात येत आहे. अल्पावधीतच हे वस्तुसंग्रहालय भक्‍तगणांसाठी खुले होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

     सद‍्गुरू बाळूमामांनी सन १९६६ मध्ये आदमापूर येथे समाधी घेतली. त्यानंतर आजपर्यंत या समाधी स्थळाचा तीर्थक्षेत्रांमध्ये विकास झाला. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात तब्बल अठरा कळपांद्वारे त्यांची बाळुमामाची ३० हजार मेंढरे फिरत आहेत. मामांचा भक्‍तगण ही मेंढरं भक्‍तिभावाने सांभाळण्याचे काम करत आहे.बाळूमामांच्या  भक्‍तांना त्या वस्तुसंग्रहालयामध्ये त्यांच्या नित्य नियमातील वापरातील दुर्मीळ वस्तू, पोशाख, आहार, वापरातील भांडी, पादुका व अन्य वस्तूंचा यात समावेश आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रथाचा यामध्ये समावेश आहे. बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर किमान अर्धा तास त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाची द‍ृश्ये भक्‍तांना पाहता यावीत, यासाठी देवालय समितीच्या वतीने दोन मजली भव्य वस्तुसंग्रहालयाची वास्तू या ठिकाणी उभी केली आहे.ही वास्तू आणि वस्तुसंग्रहालय (mesuam) लवकरच भक्‍तांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. या वास्तूचे जवळपास ७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम काही महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. एक देखणं, वैशिष्ट्यपूर्ण, चांगलं वस्तुसंग्रहालय पाहण्याची पर्वणीच बाळूमामांच्या भक्‍तांना यानिमित्ताने मिळणार आहे.

     सदर आदमापुर याठिकाणी भक्‍तांच्या निवासाची सोय व्हावी, म्हणून तब्बल दोनशे खोल्या असणारे भक्‍तनिवास उभा राहिले. हॉस्पिटलची उभारणी केली गेली. भक्‍तांसाठी अन्‍नछत्राची सोय केली. परदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या भक्‍तिभावाने तीर्थक्षेत्र आदमापुरात येतात. 

    सर्व भक्तगणांना उत्सुकता अर्थात श्री संत बाळूमामा यांच्या जीवन पट उलगडणार्‍या वस्तुसंग्रहालय निर्मितीच्या पूर्णतेची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा