Breaking

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

*लग्न होत नसल्याने स्वतःच्या शेतात सरण रचून केली आत्महत्या*


Source : aajtak.in


बुलढाणा  : विवाह जुळत नसल्याने निराश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात सरण रचून आत्महत्या केली असल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील पळशी खुर्द (ता.खामगाव) येथे गुरुवारी (ता. १७) सकाळी उघडकीस आली. महेंद्र बेलसरे (२८, रा. पळशी खुर्द) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

    विवाह जुळत नसल्यामुळे काही दिवसापासून तो नैराश्यग्रस्त होता असे समजते. बुधवारी (ता. १६)चे रात्री महेंद्रने स्वतःचे शेतात लाकडाचे सरण रचून जाळून घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ व हळहळ व्यक्त झाली. महेंद्र हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

       त्याचेकडे तीन एकर बागायती शेती असून गावातील इतर लोकांची दहा एकर शेतीसुद्धा ठेक्याने करीत होता. बुधवारी पळशी गावात दोन लग्नसोहळे होते. याचवेळी महेंद्रने स्वतःच्या शेतात लाकडाचे सरण रचले आणि अंगावर पेट्रोल ओतून सरणामध्ये उडी घेतली. यात त्याचा जळून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. सदर घटनेचा सखोल तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहे.

     या घटनेने अलीकडील तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मुळात स्त्री पुरुष यांच्यातील प्रमाण त्याचबरोबर निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक बिकट परिस्थिती आणि त्याच्या साथीला बेकारी या महत्वाच्या कारणामुळे हे प्रकार होताना दिसत आहेत. अशा गंभीर परिस्थितीवर वेळीच शासनाने व समाजाने गंभीर विचार करावा आणि पुढे होणारा अनर्थ टळला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा