Breaking

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

*शहरातील एका कॉलेजमध्ये सात जणांनी एका युवकाला केली बेदम मारहाण ; युवक बेशुद्ध*

 

एका युवकाला बेदम मारहाण


 सोलापूर : व्हॅलेंटाईन डे म्हटलं  की, तरुणाई एका विशिष्ट भावनेने व हेतूने प्रभावित होऊन व्हॅलेंटाईन डे चुकीच्या पद्धतीने साजरा करीत असतात. प्रेम या शब्दाचा खऱ्या अर्थाने अर्थ समजून न घेता सोयीनुसार त्याचा अर्थ बोध घेतला जातो आणि अनावश्यक कृती केल्या जातात. त्याचा परिणाम म्हणून अनेक हिंसात्मक घटना घडत असतात याच पार्श्वभूमीवर बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कुणाल दिपक कसबे वय वर्ष १७ रा. उपळाई रोड हा युवक गंभीर जखमी झाला होता.श्री.नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या  माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र मोटर सायकल वरून कॉलेजला येत असताना सुरक्षा रक्षकांनी मास्क लावायला सांगितल्यामुळे गाडी थांबवली असता, तू कॉलेजमध्ये यायचं नाहीस असं म्हणत सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली आहे.हत्याराचा वापर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे, सदर फिर्यादी हा मारहाणीमध्ये बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. शुद्धीवर आल्यावर वडिलांसमवेत शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार १. शशिकांत कदम, २. समर्थ खडसरे ३. समाधान बोबडे ४. अभि बोबडे ५. भैया बारंगुळे व इतर दोन जण ( त्यांचे नाव पत्ता माहीत नसुन त्यांना पाहिल्यास मी त्यांना ओळखु शकतो) या सात जणांविरुद्ध भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       या घटनेने शिवाजी कॉलेज परिसर भीतीच्या छायेखाली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबंधित संशयित तरुणांना शिक्षा करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा