नृसिंहवाडी ते खिद्रापूर मोफत दर्शन |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
नृसिहवाडी : कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे अध्यक्ष प्रसाद दुगे यांच्या संकल्पनेने भाविकांसाठी निशुल्क दर्शन बस सेवा येत्या रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ या रोजी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथून सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले
दर्शन बसची सुरुवात
📍नृसिंहवाडी
📍दत्त आमरेश्वर मंदिर औरवाड
📍घेवड्याची वेल
📍संताजी घोरपडे समाधी कुरुंदवाड घाट
📍विष्णू मंदिर कुरुंदवाड
📍खिद्रापूर कोपेश्वर मंदिर
📍नृसिंहवाडी येथे सांगता होईल.
या दर्शन बस मध्ये गाईडची सुद्धा सोय केली जाणार आहे त्यामुळे भाविकांना माहिती मिळण्यास सोयीस्कर होईल. ही दर्शन बस आठवड्याच्या दर रविवारी सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत असेल. या दर्शन बस मध्ये फक्त पर्यटक भाविकांनाच प्रवेश असेल. मोफत दर्शन बस ची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन वाढ आणि पर्यटनातून आर्थिक विकास वाढण्यासाठी चा हा प्रयत्न आहे.
तरी सर्व दत्त भक्तांनी या ऐतिहासिक दर्शन बस चा लाभ घ्यावा अशी विनंती प्रसाद दुगे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा