कोरोना काळात एक कोटीची फसवणूक |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : कोरोना काळात ऑक्सीमीटर, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायजर, या सह प्रतिबंधक साहित्य खरेदीतून फायदा मिळवून देण्याच्या अमिषाने १ कोटी ५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार साधारण मे २०२१ सुरु होता. याप्रकरणी रोहीत हरीष नागदेव, राहूल हरीष नागदेव, हरीष बलिराम नागदेव (तिघे रा. महालक्ष्मी पार्क, हॉकी स्टेडीयम चौक) या पितापुत्रांसह शाम पल्लोद या चौघांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.फिर्यादी संतोष मोहन पोवार (वय ४०, रा. दौलतनगर) यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शिरोली येथील त्यांच्या गॅरेजमध्ये नागदेव पितापुत्र वाहन खरेदीच्या बहाण्याने येत होते. या तिघांनी पोवार यांच्यासह त्यांच्या काही मित्रांना कोरोना काळात सॅनिटायजर, मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीट, वस्तूंची ऑर्डर घेवून व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा