Breaking

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

श्री दिलीप बाबुराव पाटील.....! एक स्वकर्तुत्ववान नेतृत्व हरपले.....*


कालवश दिलीप बाबुराव पाटील, शिरोळ

*ओंकार पाटील :  शिरोळ प्रतिनिधी*


        शिरोळसारख्या ग्रामीण भागातून एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेले... स्‍वकर्तृत्‍वातून.. आपल्या उत्कृष्ट भाषाशैली... आणि असलेली जनतेची नाळ... या माध्यमातून शिरोळच्या "सरपंच "पदावर अगदी तरूण वयापासून अनेक वर्षे अधिराज्य गाजवले... शिरोळ आणि पंचक्रोशीत समाजकारण.. राजकारण.. सहकार.. शैक्षणिक... आदी क्षेत्रात स्वतःच्या हिमतीवर आपले स्थान टिकवून असणारे... सतत बहुजनांचा कळवळा असणारे... शून्यातून विश्व निर्माण करणारे शिरोळ मधील एक जेष्ठ राजकिय नेतृत्व म्हणजेच आपले दिलीप दादा...

        दादांनी अनेक विकास सेवा सोसायटी... दूध संस्था.. शैक्षणिक संस्था... स्थापन करून.. स्थानिक शिरोळच्या विकासात योगदान देण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे... हे करीत असताना त्यांनी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक या पदावर काम केले... आणि याचीच दखल घेऊन.. बहुचर्चित आणि प्रसिद्ध अशा.. "गोकुळ दुध संघ..". या भल्यामोठ्या दूध संस्थेचे चेअरमन पदापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात उत्तुंग भरारी मारली... हे फक्त स्वकर्तृत्वावर.. असे हे एक आगळेवेगळे बहुजनांचे नेतृत्व...

आज आपल्यातून नाहीसे झाले....

     शिरोळच्या मातीतील सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नेतृत्व..

 मा. श्रीयुत दिलीप बाबुराव पाटील...

यांचे आज दुःखद निधन झाले...

खरोखर अतिशय वाईट बातमी आहे...

यांच्या जाण्याने शिरोळच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे...त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत...!

    त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!!त्यांच्या राजकीय सामाजिक कारकीर्दीला मानाचा सलाम...!!

भावपूर्ण श्रद्धांजली...!!

--------------------------------

शोकाकुल....

समस्त शिरोळ शहर....

--------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा