Breaking

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

*सांगलीमध्ये परस्पर बोगस कागदपत्राच्या माध्यमातून जमीन विक्रीचे व्यवहार करणाऱ्या बोगस एजंटना संतप्त जमावाने चोप देऊन काढली धिंड*

 

सांगलीमध्ये बोगस एजंटचा सुळसुळाट

*प्रविणकुमार माने  : उपसंपादक*


सांगली  : परस्पर जमीन विक्री करायला आलेला तिघांना सांगलीमध्ये लोकांनी चांगलाच चोप देत धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.   

     सांगलीतील कवलापूर येथे कोट्यवधी रुपयांचे दोन एकर जमीन मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर विक्री करायला आलेल्या तीन एजंटना लोकांनी बेदम चोप दिला. संतप्त नागरिकांनी त्या तिघांचे धिंड काढून सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. कवलापूरच्या हारुगडे यांची जमीन त्यांना कोणतीही कल्पना न देता विकली जाणार होती. बनावट ओळखपत्र, पॅन कार्ड व इतर कागद तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात विक्री करण्यात येणार होती. सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना मिळाली असता त्यांनी थेट सांगलीतील नोंदणी कार्यालयास  धडक देत पाच जणांच्या टोळीला पकडून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी या तिघांना बेदम चोप दिला. नातेवाईकांचा रुद्रावतार पाहून दोघे जण पळून गेले तसेच घटनेची माहिती मिळताच मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांनी चौक या तिघांचे सांगली शहर पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

      बोगस खरेदी विक्रीच्या  माध्यमातून अनेक जणांना फसवल्याचे चित्र समोर येत आहे. अशा प्रकारचं कृती करणारे अनेक साथीदार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची अशा भामट्या एजंटच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने तमाम नागरिकांनी खबरदारी बाळगावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा