वीर सेवा दलाकडून आरोग्य शिबीर संपन्न |
*प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी*
अकिवाट : मानवाच्या मुलभूत गरजेपैकी अन्न ,वस्त्र ,निवारा नंतर जर महत्वाची कोणती बाब असेल तर ते म्हणजे आरोग्य. 'आरोग्य हीच संपत्ती' अस म्हंटल जातं आणि त्याचं विचारातून वीर सेवा दलाच्या अकिवाट शाखे मार्फत गावच्या विशाळी यात्रे निमित्त दिनांक १ फेब्रुवारी,२०२२ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे आरोग्य शिबीर श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे संपन्न झाले.
शिबारास नारायणी मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल इचलकरंजी, श्री साई हार्ट केअर सेंटर सांगली , कृष्णा स्पीच अँड हीअरिंग क्लीनिक जयसिंगपूर, अक्षय ब्लड बँक मिरज येथील डॉक्टर, उपस्थित होते. शिबिरात हृदय विकार, जनरल चेक अप , डोळे , पोटाचे विकार ,कान-नाक-घसा यावर मोफत तपासणी करण्यात आली. तसेच मोफत ECG ची सुविधा ही उपलब्ध होती. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर ही घेण्यात आले.
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी अकिवाटचे सरपंच विशाल चौगुले, सुनील रायनाडे, बंटू रायनाडे, डॉ.आर. एस.पाटील, डॉ.उदय चौगुले, पत्रकार प्रा.अमोल सुंके, मुख्याध्यापक पी.ए. मगदूम आदी उपस्थित होते. अकिवाट गावातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमासाठी वीर सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमातील सर्व लाभार्थीने वीर सेवादल अकिवाटचे मनापासून ऋणनिर्देश व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा