ग्रह मंत्र्यांनी दिले पोलीस भरतीचा सुतोवाच |
सन २०१९ मधील पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०१९ च्या भरती प्रक्रियेतील ५२९७ उमेदवारांच्या मूलभूत प्रशिक्षणाला ७ फेब्रुवारी,२०२२ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती दिली आहे. तशा प्रकारच्या आदेशाचे संकेत गृहमत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी असून ७२३१ पोलीस पदांची भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी काढलेल्या आदेशामुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या संख्येचा द्वारे दिलासा मिळाला आहे.
सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्यानं स्वत: पोलीस भरतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. सदरची पोलीस भरतीप्रक्रिया ही टप्प्याटप्प्यानं होणार आहे.राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती.
५२०० पदांची भरती पहिल्या टप्प्यात सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पदसंख्या भरण्याची परवानगी घेऊन कार्यवाही सुरु करण्यात येईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. या पोलीस भरती पद संख्येने राज्यातील पोलिसांचं बळ वाढणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा