प्रेमाचा दिवस संकल्पना |
प्रेम म्हणजे प्रेम असतं - तुमचं आमचं सेम असतं
जिथे सत्तेच्या प्रेमापेक्षा, प्रेमाची सत्ता वरचढ ठरते तिथेच शांतता नि सौख्य नांदते...!
प्रेम...प्रेम..प्रेम.. म्हणजे काय असतं? मना-मनातील भावनांचे नाजूक नातं असतं. जात, धर्म, गरीब-श्रीमंतास भेद जाणत नसतं, प्रेम सहानभुती, जिव्हाळा सहकार्यचे बंधन असतं. माता- -पिता, बहीण-भाऊ, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण याच अतुट नात असतं अस हे प्रेम मधभरल्या फुलाचं प्रतिक असत.... प्रेम हा शब्द व्यक्तीच्या व समाजाच्या आरोग्यासाठी खरोखरच खुप महत्वाचा ठरतो.
मनुष्याचे हृदय निर्मळ असले तर त्यातुन उत्पन्न होणाऱ्या भावनेला किंवा बाहेर पडणाऱ्या शक्तीच्या प्रवाहाला प्रेम म्हणले जाते. प्रेम म्हणजे सेवा, प्रेम म्हणजे दुसऱ्याला ओळखणे, प्रेम म्हणजे दुसऱ्याची सोय पाहणे, दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करणे. मायेला ममत्वाला एका विशेष आकर्षणाला बहुदा प्रेम म्हणले जाते परंतु खरे प्रेम सर्वव्यापी, सर्वांसाठी कुठलेही अपेक्षा न ठेवणारे निर्भेळ शक्तीचा स्तोत्र असल्यासारखे असते. जगात दोन प्रकारचे प्रेम असत म्हणतात एक आपलं एक निसर्ग हा निसर्गच साऱ्या प्रेमाचं निर्मिक असतो. आपल्याला झोप लागेपर्यंत मायेने थोपटत राहणारी आई, आपलं यश बघुन अभिमानानं ऊर भरून येणारे बाबा, मागची काळजी करू नको तू पुढे जा अस सांगणारा दादा, आपलं भलं चिंतणारी, चुका पोटात घालणारी ताई, रागावलं-धोपटलं तरी गळ्यात येऊन पडणारी मुलं, संकटात हक्काने साथ देणारे मित्र, वेळीच योग्य मार्ग दाखविणारे गुरु, दिवसभर घरात एकट सोडून गेलं तरी परत येताच आपुलकीन अंगावर झेपावणार कुत्र्याच पिलू ही आणि अशी कित्येक प्रेमाचीच रूपं बा...! आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर ही सारी रूपं भेटतात. जगण्याला अर्थ देतात म्हणून तर आपलं जीवन चालत असतं बा...! याचसाठी या प्रेमाचा गैरअर्थ काढणाऱ्या या प्रेमाचा गैरवापर करणाऱ्या गैरवृत्तीवर जरूर अंकुश ठेवायला हवा पण एरवी प्रेम करणारी माणसं आणि प्रेम करणारी मननं यांचा ताटवा मात्र सतत फुलत बहरत रहायला हवा म्हणूनच आज निमीत्त जरी असेल व्हॅलेंटाईन डे चा तरी तुम्हाला प्रेमाच्या लाख लाख सदिच्छा मात्र अखंड आयुष्यभरासाठीच्या...!
खंडेराव पार्वतीशंकर हेरवाडे परिवार, शिरोळ
सामाजिक कार्यकर्ते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा