Breaking

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

*व्हाट्सअप स्टेटस वरून एका महिलेला जीव गमवावा लागला*



व्हाट्सअप मुळे गेला एकीची जीव


पालघर  : व्‍हॉट्‍स ॲप स्‍टेटस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनत चालला आहे. मात्र हाच व्हाट्सअप स्टेटस एका कुटुंबातील आईचा कर्दनकाळ ठरेल असं स्वप्नातही वाटले नाही. पालघर जिल्ह्यातील बोईसर या ठिकाणी एका कुटुंबाने मुलीसह आईला बेदम मारहाण केली. यामध्‍ये आईला जीव गमवावा लागला. लीलावती देवी प्रसाद (वय वर्षे ४८ ) असे मृत महिलेचे नाव आहे.मुलीच्या व्हाॅट्स अप स्टेटसवरून झालेल्या भांडणांमध्ये एका आईला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरातील हळहळ व्यक्त हाेत आहे.

    यासंबंधी प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, लीलावती देवी प्रसाद यांच्‍या मुलीने काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ॲप स्टेटसवर एक मेसेज ठेवला होता. यावरुन कॉलेजमध्ये तिचे भांडण झाले. या भांडणाचे पडसाद तिच्या राहत्या घरी थेट शिवाजीनगर येथे नवीन वस्तीमध्ये उमटले. १० फेब्रुवारी रोजी प्रसाद यांच्या कुटुंबातील मुली व त्यांची पत्नी लीलावती देवी यांना काहीजणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आरोपींना सोडून दिले, असा आरोप लीलावती यांच्‍या मुलीने केला आहे.

      मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍या लीलावती यांना तारापूर एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपचार सुरु असताना त्‍यांचा मृत्यू झाला. बोईसर पोलीस आरोपींना अटक करत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही, अशी भूमिका लीलादेवी प्रसाद यांचे पती व मुलींनी घेतली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आल्याचे बोईसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले. यानंतर नातेवाईकांनी लीलावती देवी यांचा मृतदेह स्वीकारला.

       मात्र सदर परिसरात संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा