![]() |
मिरजेची मयत हिना मुसा |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : विशाळगडहून परतत असताना मानोली येथे रिक्षा नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात मिरजेतील एक महिला जागीच ठार झाली आहे. इतर चार कधी जण जखमी आहेत.
रविवारी रात्री हा अपघात झाला असून हिना सरफराज मुसा वय वर्ष ३२ रा. माणिकनगर मिरज अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती सरफराज वय वर्ष ३६, मुलगा मुहम्मदअली वय वर्ष ११ हे गंभीर तर मुलगी सबा वय वर्ष ५ व रिक्षा चालक इनायत वय वर्ष ४० हे जखमी झाले आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विशाळगड दर्गात नवस फेडून घरी परतत असताना काळाने घाला घातल्याने शहरात शोककळा पसरली आहे. मुसा कुटुंबीय व अन्य सहा कुटुंबे पाच रिक्षा करून विशाळगडला दर्गा दर्शनास गेले होते नवस फेडून सायंकाळी मिरजेला परतत असताना पुढे आलेली रिक्षा मानोली गावा जवळ येताच अवघड वळणावरील नाल्यात ५० फुट खोल नाल्यात कोसळली. बॉक्साईटच्या खडकावरुन आदळत रिक्षा पलटी येऊन थांबली. हिना मुसा ह्या अडकल्या तसेच त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्या जागीच मयत झाल्या तर सरफराज यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सबाचा हात मोडला आहे. अन्य दोघांची डोक्याला व छातीला मार बसला. स्थानिक तरुण, नातेवाईक आणि जखमीसह मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. हीनाचा मृत्यू मुळे नातेवाईकांची घटनास्थळी हंबरडा फोडला. हीनाचा मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. रिक्षा पूर्ण निकामी झाली असून अपघाताची शाहूवाडी पोलिसांत नोंद झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा