इचलकरंजी मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर :कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई व पोलीस पाटील जगदीश भूपाल संकपाळ यांनी कोर्ट वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यात यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कॉन्स्टेबल सिराज भाई पसार झाला असून, पोलीस पाटील संकपाळ याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि पथकाने ही कारवाई केली. गेल्या एक महिन्यात कोल्हापूर पोलिस दलातील चार पोलीस तीन ट्रॅप मध्ये सापडले आहेत. आठवड्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील विजय कारंडे आणि किरण गावडे हे दोघे दहा लाखांची लाच घेताना रंगेहात सापडले होते. यानंतर शहापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
अशा घटनेने पोलिस दलाच्या प्रामाणिक कृती विषयी लोकांच्यात संभ्रमावस्था निर्माण होते.
2018001024
उत्तर द्याहटवा