शिरोळ पोलिसांनी केबल चोराना रंगेहात पकडले |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
जयसिंगपूर : 'कानून के हात बहूत लंबे होते है,' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील डायलॉग आता खरा ठरला आहे.कारण जयसिंगपूर शहरात पोलीसांकडून रात्री अपरात्री चोरीचा करणाऱ्या संशयित गुन्हेगारांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की ,मा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी शिरोळ पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच संशयीत फिरणारे इसमांना चेक करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिलेल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे शिरोळ पोलीस ठाणेकडील पथक पोलीस ठाणे हददीतील नांदणी नाका परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सावित्रीबाई फुले सोसायटीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या दगडी खणीजवळ तीन इसम आगीचा जाळ करून काहीतरी पेटवीत असलेबाबत दिसले. सदर तीन इसमाबददल पेट्रोलिंग पोलीस स्टाफला संशय आल्याने लागलीच जवळ जावुन पाहीले असता सदर तीन इसम त्यांचे समोर कॉपर व अॅल्युमिनीयमच्या केबलच्या वायरी जाळीत असलेले दिसुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव अनुक्रमे १] प्रशांत नंदकुमार हातळगे व.व ३८ रा. गल्ली नं १२, जयसिंगपूर ता. शिरोळ २] आसीफ दादासाहेब पिरजादे व.व २९ रा. गल्ली नं ९, जयसिंगपूर ता. शिरोळ ३] उदय महादेव भोसले व व ४४ रा. गल्ली नं १३, जयसिंगपूर ता. शिरोळ असे असल्याचे सांगितले.
सदर केबल वायरी कोठुन आणल्या व त्याचे मालकीबाबत विचारणा केली असता सदर तीन इसमांनी उडवाउडवीची व समाधानकारक उत्तर न दिलेने त्यांचेवर संशय आलेने सदर इसमांना व त्यांचेजवळ असले २५ ते ३० किलो वजनाच्या कॉपर व अॅल्युमिनीयमच्या वायरी तसेच सदर केबल वायरची वाहतुक करणेस वापरलेली अॅपे रिक्षा MH-09-EL-1471 असे ताब्यात घेवून पोलीस ठाणेस आणुन त्यांचेवर ए. डी. परब पोलीस नाईक २१९८ यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांचेविरुद्ध शिरोळ पोलीस ठाणे गु.र.नं २४/२०२२ बी. पी. अॅक्ट कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर संशयीत इसमाकडुन केबल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असलेने वरील तीन संशयीत इसमांना सदर गुन्हयात अटक करणेत आली. त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, जयसिंगपुर कोर्ट येथे हजर केले असता मा. कोर्टाने त्या तीन संशयीत इसमांना १४ दिवस न्यायलयीन कोठडी मंजुर करणेत आली. गुन्हयाचा पुढील तपास पो हे कॉ २/१९१ धुमाळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक सो कोल्हापुर, मा. जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा. रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपुर विभाग, शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुरणे, पोलीस हवालदार राजेंद्र धुमाळ, पोलीस नाईक ताहीर मुल्ला,अभीजीत परब, गजानन कोष्टी, पोलीस अंमलदार संजय राठोड या पथकाने केली आहे.
शिरोळ पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा