Breaking

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

*ऑनलाइन परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा देत असताना केल्या संशयास्पद हालचाली ; परीक्षा विभाग करणार कारवाई : प्र.संचालक मा.गजानन पळसे*


शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर


*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*


कोल्हापूर :  कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर २०२१ हिवाळी सत्राच्या एकुण ६६४ अभ्यासक्रमाच्या परीक्षापैकी विद्यापीठस्तरावरील ३६२ परीक्षापैकी काही परीक्षांना दि.१४ फेब्रुवारी २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरळीतपणे सुरवात झाली.

      आज दि. १६. फेब्रुवारी रोजी B.Tech. in Electronics & Telecommunication. Computer Science, Chemical Engineering, Civil Engineering, Mechanical Engineering, B.Com. (I.T., Bank Management), B.Sc. (Sugar Technology, Bio-technology, IT, Environmental Science), B. Voc. in ( Agriculture, Sustainable Agriculture, Sustainable Agriculture Management, IT. Commerce, Automobile, Food Processing & Management, Printing and Publishing. Tourism and Service Industry) etc या अभ्यासक्रमाच्या ४१ विषयाच्या परीक्षा पार पडल्या. आजच्या परीक्षेसाठी १६७८ विद्यार्थ्यांपैकी १६७० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. परीक्षेस विद्यार्थ्याच्या उपस्थितीचे प्रमाण हे शेकडा ९९.५२ इतके होते.

    आज परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यापैकी एकुण २२ विद्यार्थी परीक्षा देत असताना संशयास्पदरित्या हालचाल करताना विद्यापीठाच्या विशेष पथकास आढळून आले असून त्यांच्यावर विद्यापीठ नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

   या परीक्षेपासून विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रॉक्टरिंगप ध्दत सुरु केली आहे. यासाठी विद्यापीठाकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे. सदर पथकाकडून आज कामकाज करुन प्रत्यक्ष हेडफोन वापरुन गैरप्रकार करणा-या अन्य मोबाईल वापरून इतरांशी दूरध्वनीवरुन बोलणारे एकाच फेममध्ये दोन विद्यार्थी दिसणारे इ. अशा विद्यार्थ्यांवर गैरप्रकार म्हणून प्रत्यक्ष नोंद करुन परीक्षा प्रमाद समितीमार्फत नियमानुसार कारवाई विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच ऑनलाईन परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा