Breaking

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

*सुयेकचे माजी अध्यक्ष व डॉ.पतंगराव कदम कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.डी.टी. पाटील कालवश - केले देहदान*

 

कालवश डॉ. डी.टी.पाटील,सांगली

*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सांगली : डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीचे सेवानिवृत्त प्राध्यापक  डॉ.डी.टी.पाटील यांचे २३ जानेवारी २०२२ रोजी देहवासन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह मिरज मेडिकल कॉलेजला वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय चिकित्सेसाठी उपयोगी व्हावा म्हणून डॉ.पाटील यांच्या इच्छेनुसार दान केले.

     डॉ.दिनकर तुकाराम पाटील हे मूळचे कागल तालुक्यातील उंदरवाडी या गावचे असून नोकरीनिमित्त सांगली येथे स्थायिक झाले. अत्यंत प्रामाणिक व हुशार, संयमी, शिस्तबद्धता हाच त्यांचा स्थायीभाव, विद्यार्थीप्रिय व संशोधन कार्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणारे प्रेरणा स्त्रोत, उत्तम संशोधक, व्यासंगी व्यक्तिमत्व व अध्यात्मिक कार्यात नेहमी मग्न असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. रत्नागिरीच्या नाणीज मठाचे संस्थापक यांच्या प्रेरणेने व त्यांनी दिलेल्या सामाजिक शिकवणीनुसार पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपला मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सर्व कागदांची पूर्तता कुटुंबियातील घटकांनी दिलेल्या सहमतीनुसार पूर्ण केली होती. 

    डॉ.डी.टी.पाटील रविवारी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे उरकून बसले होते आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यानंतर मिरज मेडिकल मध्ये दाखल केले, डॉक्टरानी तपासणी केले असता त्यांना मृत घोषित केले.

    कुटुंबीयांनी मात्र त्यांची आध्यात्मिक  गुरु विषयी असलेली अटळ श्रद्धा व त्यांनी केलेल्या देहदान संकल्पनेनुसार पुढील प्रक्रियेसाठी मिरज मेडिकल कॉलेजला रीतसर कळविले. त्यानुसार त्यांचा मृतदेह मिरज मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आला.

      मुळात डॉ.पाटील यांचा गरीब शेतकरी कुटुंबापासून  सुरू झालेला संघर्षमय प्रवास नोकरीनंतर ही सुरुवातीच्या टप्प्यात कष्टप्रद होता मात्र नंतरच्या टप्प्यात हा प्रवास मृत्यू पर्यंत विद्यार्थीमय,आध्यात्मिक व आनंदमय होता. कुटुंबीयांनी दिलेली साथ व मोजके मित्रपरिवार यांच्या परिघामध्ये ते आनंददायक व परिपूर्ण होता.मात्र अखेर हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक संवेदनशीलतेनुसार त्यांचा मृतदेह कुटुंबीयाने रीतसर देहदान केला.

      अर्थशास्त्राचा या प्राध्यापकांने आयुष्यभर लेखणी झिजवली, विद्यार्थ्यांच्या हितार्थ त्यांची धडपड व अजातशत्रू असणारे हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. 

    सरतेशेवटी ,  मरावे परी । कीर्तिरूपे उरावे । या म्हणीप्रमाणे  वैचारिक व कार्यप्रवण असणारे डॉ. पाटील यांनी देहदान करून आपल्या उक्तीला कृतीची जोड दिली आणि खऱ्या अर्थाने मृत्यूनंतरही मानवतावादी कार्य केले. त्यांच्या या कार्याला शतशः प्रणाम! प्रणाम!


भावपूर्ण आदरांजली  व विनम्र अभिवादन !

1 टिप्पणी: