Breaking

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

*कोल्हापूर महसूल विभागाच्या अन्यायी कारवाईविरुद्ध मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचा एल्गार ;सोमवारी काढणार डंपर मोर्चा*

 

"मी वडार महाराष्ट्राचा" जिल्हा कोल्हापूर : डंपर आंदोलन


*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


टोप, ता. १२ : महसूल महसूल विभागाच्या अन्यायी कृत्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आली असून याला संबंधित विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. तसेच अन्यायकारक कारवाईच्या विरोधात सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर वडार समाजाचा मोठा डंपर  मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      श्री. पोवार म्हणाले की, 'टोप परिसरात ५० वर्षांपासून वडार समाजाचे २००० लोक राहतात. हा समाज दगड फोडून उपजीविका करत आहे. गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाकडील तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल मनमानी पद्धतीने कारवाई करत आहेत. जाणूनबुजून दगड, मुरूम व खडी वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून चालक व कामगारांना धमकावत गुन्हे दाखल करत आहेत. ही मनमानी अत्यंत क्लिष्ट आहे. 'समाजबांधवांनी कर्ज घेऊन वाहने घेतली असून, हप्ते थकल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या कारवाईमुळे खाण मालक, क्रशर व्यावसायिक हे दगड, खाण व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत आले आहेत. या विरोधात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील समाज सोमवारी (ता. २१) डंपर मोर्चा काढणार आहेत."

      संभाजी पोवार, तानाजी पोवार,सतीश नलवडे, शामराव पोवार, चंद्रकांत भोसले, अर्जुन पोवार, शिवाजी घोरपडे, उमेश पोवार, बापू पवार, संतोष नलवडे, सूरज नलवडे, रोहित शिंदे आदी उपस्थित होते.

      या समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून ज्या व्यवसायावर पोटाची खळगी भरली जाते त्या विरोधातच काही मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जाचामुळे होत आहे. वेळीच प्रशासनाने याचं गांभीर्य ओळखून त्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी एकूण वडार समाज बांधवाकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा