जयसिंगपुरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला लागली आग |
*जीवन आवळे : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शहरातील कोल्हापूर सांगली रस्त्या लगत व जयसिंगपूर-उदगाव बँके जवळ असणाऱ्या समृद्धी इलेक्ट्रॉनिक नामक दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून बघ्यांची गर्दी मात्र प्रचंड आहे.
या आगीचे नेमकं कारण काय? किती प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या विषयी लोकांच्या मध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र दुकानाला लागलेली आग पाहून लोकांच्या कडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा