डोंगरावरील आग विझवताना जैनापुरचे कोळी बंधू |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
निमशिरगाव : निमशिरगाव तमदलगे डोंगरावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निमशिरगाव/ तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या डोंगराला आग लागली होती. या डोंगराचा सुमारे एकरचा परिसर आगीच्या विळख्यात सापडला होता. या आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र डोंगरावर भ्रमंतीसाठी आलेल्याच एखाद्या व्यक्तीकडून आग लागली असावी असा अंदाज आहे.
आगीत खाक झालेला डोंगर |
आगीची घटना लक्षात येताच रस्त्या पासूनच या जवळच्या अंतरावर असणाऱ्या अक्षय कोळी व विनायक कोळी या दोन तरुणांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या व मातीचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग डोंगरावर लागल्याने पाणी देखील मिळू शकले नाही, तसेच वाऱ्याचा वेग कमी असल्याने आग अधिकच भडकली नाही. मात्र या आगीत गवत जळून खाक झाली आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की,निमशिरगाव- तमदलगे गावात असलेल्या एका डोंगराला आग लागली. बुधवारी ०२ फेबु २०२२ दुपारी दोनच्या सुमारास अचानक या डोंगराला आग लागली. वाऱ्याचा वेग कमी असल्याने आगीने उग्र रूप धारण केले नाही तसेच आग कमी असल्याने सहजपणे विझवता आली. त्यामुळे आग अधिक न भडकल्याने डोंगर परिसरात ही आग पसरली नाहीं. या दुर्दैवी घटनेने सदर डोंगर माथ्यावरील जवळपास एक एकर चा परिसर जळून खाक झाला आहे. अशी माहिती जैनापूरचे युवक अक्षय कोळी आणि विनायक कोळी यांनी दिली.
खरं म्हणजे अशी कृती करणाऱ्या घटकांना शोधणे व त्यांच्यावर उचित कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र या दोन युवकांनी लागलेली आग विझवण्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका पार पाडली खरोखरच सदर युवक हे अभिनंदनास पात्र आहेत. नाहीतर मोठी दुर्घटना किंवा पुढे होणारा अनर्थ या युवकांच्या धाडशी व प्रामाणिक प्रयत्नामुळे टळला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा