Breaking

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

*माजी आमदार उल्हास पाटील यांचे मोठे बंधू व शिरोळचे माजी सरपंच श्री. माधवराव संभाजीराव पाटील (बापू) यांचे दुःखद निधन....!!*

 

कालवश माधवराव संभाजी पाटील,शिरोळ


*ओंकार पाटील :  शिरोळ प्रतिनिधी*


एक कुशल संघटक..  हरपला..!!


      शिरोळ नगरीचे एक कार्यकुशल असे व्यक्तिमत्व गाजवणारे माजी सरपंच, जय महाराष्ट्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,माजी आमदार मा.श्री उल्हासदादा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आणि आपल्या सर्वांचे लाडके  श्री. माधवराव संभाजीराव पाटील (बापू) यांचे आज दुःखद निधन झाले. शिरोळ शहरात शोककळा पसरली आहे.

                  बापू म्हणजे...

 एक उच्चविद्याविभूषित जाणतं.. शेतकरी कुटुंबातील एक जबाबदार व्यक्तिमत्व होतं...

बापू म्हणजे... जय महाराष्ट्र मंडळाची आन.. मान शान.. होते..

बापू म्हणजे... एक करारी आवाजाचा... आणि त्या आवाजाला सन्मान असणारा.. एक मंडळाचा सच्चा अध्यक्ष होते...

बापूंच्या शब्दाला धार होती... एक आदर्श संघटन कौशल्य कसे असावे... याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बापू होय...

दहीहंडी... गणेश उत्सव... मिरवणूक... गावचा उरूस... कोणतेही शुभ कार्य असो... कोणावरही दुःखद प्रसंग ओढावला असो... या ठिकाणी बापूंची प्रामाणिक धडपड दिसून यायची...

गावातील तरुणांचे बापू लाडके होते....

बापू हे... कला क्रीडा संस्कृती.. सांस्कृतिक..आणि व्यायाम.. याच बरोबर राजकारण आणि समाजकारण.. सहकार आदी क्षेत्रात.., एक  अष्टपैलू नैपुण्यपूर्ण असे व्यक्तिमत्व असे म्हणावे लागेल...

शिरोळच्या विकासाच्या जडणघडणीत बापूंचा मोठा हातभार होता...

असे व्यक्तिमत्व परत होणे नाही....

बापूंच्या जाण्याने.. जय महाराष्ट्र मंडळ तसेच गावातील आमच्यासारखे अनेक तरुण हळहळ व्यक्त करीत आहेत... बापू व्यक्तिमत्व असे होते...

बापूंच्या निधनाने.. त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या डोंगराएवढ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..!!

बापूंना 

भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन..!!

----------------------------------------

शोकाकुल...

समस्त शिरोळ शहर.

------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा