Breaking

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

*विद्यापीठ ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार करणा-या परीक्षार्थीवर संगणक पर्यवेक्षण (Proctoring) द्वारे नियंत्रण : गजानन पळसे,प्र. संचालक*

 

मा.गजानन पळसे, संचालक, शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन विभाग


*मालोजीराव माने :  कार्यकारी संपादक*


कोल्हापूर :  ऑक्टोबर-२०२१च्या हिवाळी परीक्षा १४/०२/२०२२ पासून ऑनलाइन पद्धतीने सुरळीतपणे सुरु आहेत. सदर परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या परीक्षार्थींवर पर्यवेक्षण करण्यासाठी (Proctoring)  विद्यापीठाकडून पर्यवेक्षण पथक नेमण्यात आले आहे.

      विद्यापीठीय परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारे गैरप्रकार करणा-या परीक्षार्थोवर  विद्यापीठ नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी खालील बाबी परीक्षार्थीनी केल्यास तो परीक्षा प्रमाद समजून त्यांच्यावर विद्यापीठीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तरी सदर बाबी खालील प्रमाणे

१. सदर परीक्षा ऑनलाइन वस्तुनिष्ठ स्वरूपात असलेने परीक्षार्थीनी आपल्या इलेक्ट्रानिक उपकरणाचा मोबाइल व लॅपटॉप इत्यादीचा कॅमेरा पूर्ण परीक्षा संपेपर्यंत सुरू ठेवणे बंधन कारक आहे. कॅमेरा बंद करणे चेहरा दिसणार नाही अशा स्थितीत उपकरणे ठेवू नये.


 २. परीक्षार्थीनी परीक्षेसाठी वापरण्यात येणा-या इलेक्ट्रानिक उपकरणाव्यतिरिक्त अन्य उपकरणाचा वापर करू नये.


३. परीक्षेदरम्यान परीक्षार्थीनी अन्य कोणाशी संभाषण करू नये.


४.  परीक्षार्थी परीक्षा एकटयानेच स्वतंत्रपणे द्यावी शेजारी अन्य कोणास ही बसवू नये.


५. परीक्षार्थीनी एका विंडो/ ब्राउझरवर परीक्षा देत असताना अन्य विन्डो/ ब्राउजर उघडू नये.


६. परीक्षा ही दृश्य स्वरूपात असल्याने हेडफोन व इअर बड इ. सारख्या उपकरणांचा वापर करू नये


७. परीक्षेसाठी  वापरत असलेल्या उपकरणा वरील मजकुराचा अन्य उपकरणाच्या माध्यमातून फोटो घेऊ नये.


 ८. परीक्षेवेळी परीक्षार्थीने अन्य व्यक्तीशी दूरध्वनीद्वारे संभाषण करू नये.

    उपरोक्त बाबी संगणकप्रणालीद्वारे पर्यवेक्षण  (Proctoring) करतेवेळी निदर्शनास आलेस सदर बाब परीक्षा प्रमाद समजून विद्यापीठ नियमानुसार अशा परीक्षार्थीवर कारवाई करणेत येणार असल्याची माहिती मा. गजानन पळसे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा