वृद्ध व्यक्तीने केला पत्नीचा खून |
हिंगोली : घरगुती हिंसाचाराचा कडक कायदा असून ही घरगुती हिंसाचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. मात्र ज्या वरिष्ठ लोकांचा आदर्श घ्यावा अशा ९० वर्षाच्या आजोबा कडून एक दुर्देवी घटना घडली असून आपल्या ७८ वर्षीय पत्नीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
हिंगोली मधील सेनगाव तालुक्यात ७८ वर्षीय महिलेला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने हातपाय बांधून जाळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुंदराबाई कुंडलिक नाईक वय वर्ष ७८ अशा मयत आजीचे नाव आहे. तर कुंडलिक शिवराम नाईक असे आरोपीचे नाव आहे.
कुंडलिक शिवराम नाईक यांना पाच मुली असून, त्यांची लग्न झाली आहेत. त्यामुळे पती-पत्नी दोघेच घरी राहत. कुंडलिक नाईक यांचा स्वभाव रागीट होता. स्वयंपाक करण्यास थोडा उशीर केल्याने कुंडलिक नाईक यांनी पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून दिले.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोउपनी बाबुराव जाधव, राहुल गोटरे, गजानन बेडगे यांनी भेट दिली. तर याप्रकरणी शिरपूर जैन येथील जरिता वाघ यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक नाईक विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
अशा घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा